गोवा खबर

उद्योग वसाहतींमधील अग्निशमन यंत्रणा बळकट करण्याचे गोवा-आयडीसीचे उद्दिष्ट

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोवा औद्योगिक विकास महामंडळाद्वारे (गोवा-आयडीसी) १४ ऑगस्ट २०२६ रोजी येथील गोवा मनोरंजन संस्थेमध्ये राज्यातील सर्व औद्योगिक वसहातींमधील अग्निशमन यंत्रणा सुसज्ज करण्याबाबत एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये गोवा-आयडीचे अभियांत्रिक विभागातील कर्मचारी, गोवा राज्य उद्योग संघटनेचे अध्यक्ष आणि विविध औद्योगिक वसाहत संघटनांचे अध्यक्ष सहभागी झाले होते.

राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील अग्निशमन यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी सर्वंकष दृष्टिकोन निश्चित करणे हा या कार्यशाळेमध्ये मुख्य भर राहिला. वसाहतींमधील अग्निशमन यंत्रणेचे आधुनिकीकरण करणे व सक्षमीकरण करणे, मानक कार्यप्रणाली (एसओपी)चा विकास करणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठीचा आराखडा निश्चित करणे, आपत्कालीन स्थितीवेळी तातडीने आणि प्रभावीपणे उपाययोजना हाती घेण्यासाठी अग्निशमन यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे क्षमतावर्धन करणे या विषयांवर कार्यशाळेत विचारमंथन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना, गोवा-आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पी. प्रविमल अभिषेक, आयएएस यांनी प्रभावी आपत्कालीन व्यवस्थापनासाठी पर्याप्त साधनसुविधा आणि यंत्रणेची सज्जता असणे आवश्यक असल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला. यासाठी सर्व औद्योगिक वसहातींची तपासणी करून अग्निशमन यंत्रणेच्या स्थितीबाबतच्या वास्तवतेने आकलन करणे, अशी परिस्थिती हाताळण्यासाठीची स्पष्ट नियमावली आणि अग्निशमन यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे पर्याप्त प्रशिक्षण राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

“राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या संख्येने सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग कार्यरत आहेत. या उद्योग संस्थांना आपत्कालीन स्थितीमध्ये आवश्यक पाठबळ, सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी आपली सज्जता असणे अनिवार्य आहे. आपत्कालीन स्थितीची माहिती मिळताच त्या ठिकाणी जलदगतीने आणि समन्वयाने अग्निशमन सेवा उपलब्ध केली तर जीवितहानी, मालमत्तेची हानी टाळणे किंवा कमी करणे शक्य होईल आणि यामुळे परिसरातील औद्योगिक कामकाजही विस्कळित होणार नाही,” असे मत त्यांनी मांडले.

नॅशनल फायर प्रोटेक्शन अँड सेफ्टी इंजिनिअर्सचे अग्निशमन आणि सुरक्षा सल्लागार श्री. अशोक पोटे यांनी विषयतज्ञ या नात्याने कार्यशाळेत मार्गदर्शन केले. औद्योगिक वसाहतींमध्ये अग्निशमन यंत्रणा प्रभावीपणे

Trending

Exit mobile version