गोवा खबर: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथील आपल्या निवासस्थानी तिरंगा ध्वज फडकावून देशाप्रती अभिमान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य तसेच भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या निवासस्थानी तिरंगा फडकावला.
यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. देशभरात साजऱ्या होत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा!’ असा संदेश देत नागरिकांना स्वातंत्र्यदिनाचा उत्सव उत्साहाने आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्याचे आवाहन केले.