गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणाऱ्या राज्य पातळीवरील स्वातंत्र्य दिवस समारंभात उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस अधिकाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येईल.
हेडकॉन्सटेबल, वाहतूक विभाग, श्री झुबेर मोमिन यांना राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस उपअधिक्षक वाहतूक विभाग, सुदेश नार्वेकर, पोलीस अधिक्षक गुरूदास गावडे आणि गुरूदास कदम यांना पोलीस पदके प्रदान करण्यात येईल.