गोवा खबर:२०२७ वर्षात होणाऱ्या गोवा राज्य विधानसभा निवडणूकीसाठी १७ ऑगस्टपासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनची तपासणीसुरू करण्यात येईल. भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मशीनची तपासणी होईल.
उत्तर गोव्यात आल्तिन पणजी येथे फार्मसी कॉलेजच्या मुलांच्या (बॉयस ) हॉस्टेल इमारतीतील स्ट्रॉग रूमात १७ ते २८ ऑगस्टपर्यंत तर दक्षिण गोव्यात मडगांव येथील जुन्या जिल्हाधिकारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर १७ ते ३१ ऑगस्टपर्यंत ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनची तपासणीहोईल.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनची तपासणी करण्याच्या वेळापत्रकानुसार सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना कळविले आहे आणि त्याप्रमाणे राजकीय पक्षांनी तपासणी प्रक्रियेच्यावेळी उपस्थित राहण्यासाठी आपल्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी.