गोवा खबर

युतीच्या विषयावर बोलण्याचा गोविंद गावडेंना अधिकार आहे का? सुदिन ढवळीकरांचा सवाल

Published

on

Spread the love


गोवा खबर:
 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) हा युतीचा भाग असून युतीची तत्त्वे आणि नियमांचा पक्ष आदर करणार असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी युतीसंदर्भातील विषयांवर भाष्य करण्याचा गोविंद गावडे यांना अधिकार आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

युतीशी संबंधित निर्णय किंवा मतभेद सार्वजनिकरीत्या मांडण्याऐवजी योग्य पक्षीय व्यासपीठावर त्यांची चर्चा झाली पाहिजे, असे ढवळीकर म्हणाले.

भाजपची कोअर कमिटी आणि कार्यकारिणी समिती ही युतीसंदर्भातील विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी योग्य व्यासपीठे असल्याचे त्यांनी सांगितले.

मगो पक्ष युतीमध्ये कायम असून युतीच्या तत्त्वांचा सन्मान करत आपली भूमिका कायम ठेवणार असल्याचेही ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

Trending

Exit mobile version