गोवा खबर

राज्य पातळीवर नागरी सेवा योगासन स्पर्धा

Published

on

Spread the love

गोवा खबर:क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने वर्ष २०२६-२७ साठी राज्य पातलीवर नागरी सेवा योगासन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा पुरुष योगासन आणि महिला योगासन अशा दोन गटांमध्ये (४० वर्षांखालील, ४०-५० आणि ५० वर्षांवरील श्रेणी) होईल, ज्यामध्ये पारंपरिक एकेरी, कलात्मक जोडी, आणि लयबद्ध (जोडी) यांसारख्या शैलींचा समावेश असेल. पुरुष योगासन स्पर्धा १८ ऑगस्ट २०२६ रोजी आणि महिला योगासन स्पर्धा १९ ऑगस्ट २०२६ रोजी, कांपाल येथील इनडोअर हॉलमध्ये सकाळी ठीक ९.०० वाजता होईल.

प्रवेशिका क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाकडे १२ ऑगस्ट २०२६ रोजी पर्यंत सादर करावी. स्पॉट एन्ट्रीला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशिका कृपया dir-spor.goa@nic.in या ईमेलद्वारे पाठवाव्यात.

अधिक माहितीसाठी योजना प्रभारी श्री प्रकाश सतरकर ९८२३२६९०८८/ ७९७२३४३६९६ यांच्याशी संपर्क साधावा.

Trending

Exit mobile version