गोवा खबर

सप्टेंबरमध्ये रेशनधारकांना धान्य वितरण; अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो तांदूळ मोफत

Published

on

Spread the love

गोवा खबर: सप्टेंबर २०२६ महिन्यासाठी विविध श्रेणीतील रेशन कार्डधारकांना तांदूळ आणि गव्हाचे वितरण करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजनेच्या रेशन कार्डधारकांना प्रति कार्ड ३५ किलो फोर्टिफाईड तांदूळ मोफत, तर प्राधान्यक्रम कुटुंबांना प्रति लाभधारक ५ किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे.

एपीएल रेशन कार्डधारकांना १२.५० रुपये प्रति किलो दराने प्रति कार्ड १२ किलो फोर्टिफाईड तांदूळ, तसेच १० रुपये प्रति किलो दराने ८ किलो गहू दिला जाईल.

कल्याणकारी संस्था योजनेच्या कार्डधारकांना तांदूळ ६.१५ रुपये प्रति किलो, तर गहू ४.८० रुपये प्रति किलो दराने वितरित करण्यात येणार आहे.

सर्व स्वस्त धान्य दुकान मालकांनी आपला धान्य कोटा उचलून रेशन कार्डधारकांना त्याचे वितरण करावे. रेशन कार्डधारकांनीही आपला निर्धारित रेशन कोटा संबंधित स्वस्त धान्य दुकानातून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धान्य वितरणासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास रेशन कार्डधारकांनी संबंधित मामलेदार किंवा नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडे तक्रार सादर करावी.



Trending

Exit mobile version