गोवा खबर

जीवनाला योग्य दिशा देण्यात गुरूची भूमिका महत्त्वाची : शिष्यगुरू सुब्रायकाका खांडेपारकर

Published

on

Spread the love

_‘द इटर्नल गुरू’ पुस्तकाचे खांडेपार येथे प्रकाशन_

गोवा खबर : मानवी जीवनाला योग्य दिशा देण्याबरोबरच व्यक्तीच्या वैचारिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत गुरूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. भारतीय परंपरेतील गुरू-शिष्य नाते हे केवळ ज्ञान देण्यापुरते मर्यादित नसून माणसाच्या जीवनाला आकार देणारे आहे, असे प्रतिपादन शिष्यगुरू सुब्रायकाका खांडेपारकर यांनी केले.

बाळकृष्ण वसंत कामत लिखित ‘द इटर्नल गुरू’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच खांडेपार येथील परमपूज्य पद्माकर महाराज आश्रमात शिष्यगुरू सुब्रायकाका यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. गुरूचे जीवनातील स्थान आणि गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद करताना त्यांनी लेखक बाळकृष्ण कामत यांच्या लेखनकार्याचे कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.

लेखक बाळकृष्ण वसंत कामत यांनी आपल्या मनोगतात पुस्तकाच्या लेखनापासून प्रकाशनापर्यंतचा प्रवास उलगडला. पुस्तकामागील प्रेरणा आणि लेखनप्रक्रियेविषयी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘द इटर्नल गुरू’ला पुस्तकरूप देण्यासाठी सहकार्य केलेल्या मुकेश थळी आणि किशोर अर्जुन यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय म्हांबरे यांनी केले. त्यांनी पुस्तकाची पार्श्वभूमी आणि त्यामागील लेखकाची भूमिका उपस्थितांसमोर मांडली.

प्रकाशन सोहळ्याला गुरुभक्त आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Trending

Exit mobile version