गोवा खबर

मुख्यमंत्र्यांहस्ते पत्रकार कृत्तज्ञता निधी योजनेखाली मंजुरी पत्र प्रदान

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज माहिती व प्रसिद्धी खात्याच्या ‘पत्रकार कृतज्ञता निधी’ योजनेअंतर्गत ज्येष्ठ पत्रकार श्री प्रसाद शेट्टे काणकोणकर यांना मंजुरी पत्र सुपूर्द केले.

मुसळधार पावसामुळे घराचे मोठे नुकसान झाल्याने श्री. काणकोणकर यांना घराच्या दुरुस्तीसाठी या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

पत्रकार कृतज्ञता निधी योजनेअंतर्गत एका पत्रकाराला विशेषतः घराच्या दुरुस्तीसाठी प्रथमच आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून अनपेक्षित अडचणींना तोंड देणाऱ्या पत्रकारांना वेळेवर मदत करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकण्यात येत आहे.

माहिती आणि प्रसिद्धी खाते आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत अडचणीत आढळलेल्या गरजू पत्रकारांना तात्काळ आर्थिक मदत देण्यासाठी ‘पत्रकार कृतज्ञता निधी योजनेची अंमलबजावणी करते. या योजनेअंतर्गत  पात्र पत्रकारांना २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री अभिर चं. हेदे आणि माहिती अधिकारी श्री किरण मुनांनकर यावेळी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version