गोवा खबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली भेट

Published

on

Spread the love

गोव्यातील विकासकामे व संघटनात्मक विषयांवर चर्चा

गोवा खबर: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन गोव्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा तसेच पक्ष संघटन बळकटीकरणाच्या मुद्द्यांचा आढावा सादर केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, गोव्यातील डबल इंजिन सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकास उपक्रमांची माहिती त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना दिली. याशिवाय, पक्षाची संघटनात्मक ताकद तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही सविस्तर चर्चा झाली.

यावेळी डॉ. सावंत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून प्रेरणा घेत गोवा सरकार प्रत्येक नागरिकाच्या सेवेसाठी कटिबद्ध असून ‘विकसित आणि स्वयंपूर्ण गोवा’ घडविण्याच्या दिशेने सातत्याने कार्यरत आहे.

मुख्यमंत्र्यांनी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याबरोबरच विकासकामांचा वेग कायम ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

Trending

Exit mobile version