गोवा खबर: पारंपरिक हातमाग कलेचा वारसा जपण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांना त्याबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने ‘हँडलूम हेरिटेज स्पर्धे’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली आहे.
स्पर्धेत फोटोग्राफी आणि लघुलेखन (100 ते 150 शब्द) असे दोन विभाग आहेत. फोटोग्राफी विभागात हातमागावरील वस्त्रे परिधान केलेले किंवा काम करत असलेल्या कारागिरांचे छायाचित्र सादर करायचे आहे. तर लघुलेखन विभागात हातमागाची परंपरा, इतिहास, वैशिष्ट्ये, कारागिरी किंवा त्याचे महत्त्व यावर 100 ते 150 शब्दांत लेखन करायचे आहे.
स्पर्धेतील विजेत्यांची निवड सर्जनशीलता, विषयाशी सुसंगतता, दृश्यात्मक आकर्षकता आणि प्रभाव या निकषांवर केली जाणार आहे.
प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि गिफ्ट हॅम्पर देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ६ ऑगस्ट २०२६ असून, सहभागी होण्यासाठी @goanparampara या सोशल मीडिया हँडलला फॉलो करून टॅग करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 88060 38755 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.