गोवा खबर: रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी (RGP)च्या शिस्तपालन समितीने पक्षाचे नेते अजय खोलकर यांना औपचारिक नोटीस बजावत निलंबित करण्यात आलेल्या दहा सदस्यांवरील आरोपांच्या चौकशीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे, नोंदी व इतर पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. समितीच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार ही नोटीस ३० जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आली आहे.
नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, निलंबित सदस्यांविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष पडताळणी करण्यासाठी अजय खोलकर यांच्या ताब्यातील किंवा नियंत्रणातील संबंधित कागदपत्रे, तक्रारी, नोंदी आणि इतर पुरावे समितीसमोर सादर करणे आवश्यक आहे. या पुराव्यांच्या आधारे समिती चौकशी पूर्ण करून आवश्यक शिस्तभंगात्मक कारवाईबाबत निर्णय घेणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नोटीसमध्ये खालील निलंबित सदस्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत:
आदित्य देसाई
प्रेमानंद हावलू गवडे
विशाल गाऊन्स देसाई
प्रशांत सुरेश पागी
राहुल नाईक
डॅग्ले फर्नांडिस
मेल्विन दा सिल्वा
लिसिओ रॉनकॉन
मनील्ला शिरोडकर
संजन श्रीनिवास नाईक
शिस्तपालन समितीने अजय खोलकर यांना ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, एच. नं. ७६४/२, मालवारा, आगसईम, तिसवाडी, गोवा येथे समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
नोटीमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, योग्य कारणाशिवाय समितीसमोर गैरहजर राहिल्यास किंवा मागविण्यात आलेले पुरावे सादर करण्यात अपयश आल्यास समिती उपलब्ध नोंदींच्या आधारे चौकशी पुढे नेईल आणि त्यातून प्रतिकूल निष्कर्ष काढण्याचा अधिकार राखून ठेवेल.
समितीने ही चौकशी स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याचे नमूद करत सर्व संबंधितांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.