गोवा खबर

सनातन संस्थेच्या वतीने गोव्यात ७ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव

Published

on

Spread the love

गोवा खबर : सनातन संस्थेच्या वतीने यंदा ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ २९ जुलै या दिवशी मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड,  तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर गोव्यात ७ ठिकाणी साजरा केला जाणार आहे.

या महोत्सवात व्यासपूजन आणि भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, राष्ट्रभक्त अन् धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप, तसेच ‘रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा’ या विषयांवरही मार्गदर्शन होणार आहे.

गोव्यात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, ब्रह्मस्थळ, बायणा, वास्को (सायं. ५ वा.), राजीव गांधी कला मंदिर, बेतोडा रोड, फोंडा (सायं. ५:३० वा.), श्री सिद्धपुरुष नारायण देव देवस्थान, काणका बांध, म्हापसा (सायं. ५ वा.), श्री देव कळस मांगर सभागृह, मोरजी, पेडणे (सायं. ५ वा.); रवींद्र भवन, फातोर्डा, मडगाव (सायं. ५:३० वा.), नगरपालिका सभागृह, बाजार, साखळी (सायं. ४:३० वा.) आणि क्षात्रतेज सभागृह, आझाद भवनसमोर, पर्वरी (सायं. ५:३० वा.) या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव होणार आहे. महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.

Trending

Exit mobile version