गोवा खबर: पेडणे सेवा ट्रस्टच्या माध्यमातून विविध गावांमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या कर्नर बैठकींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, युवक रोजगार, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येत आहे.
अलीकडेच भूतवाडी, माऊसवाडा आणि वजरी येथे झालेल्या बैठकींमध्ये श्री. उत्तम पार्सेकर यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या गरजा जाणून घेतल्या. या बैठकींमध्ये युवकांसाठी रोजगाराच्या संधी, गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना तसेच महिलांच्या सक्षमीकरण आणि स्वावलंबनावर विशेष भर देण्यात आला.
भूतवाडी येथील बैठकीत उत्तम पार्सेकर यांनी पेडणे सेवा ट्रस्टमार्फत दिलेली आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
माऊसवाडा येथे ग्रामस्थ आणि भाविकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या प्रगतीसाठी कायम कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.
वजरी गावातील महिलांसोबत आयोजित कर्नर बैठकीत महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि रोजगाराच्या संधींवर चर्चा झाली. तसेच महिलांना भजनी साहित्य (वाद्यसामग्री) उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पेडणे सेवा ट्रस्ट कायम पाठिशी राहील, असे उत्तम पार्सेकर यांनी सांगितले.
या बैठकींमधून स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या सहभागातून विकासाला गती देण्याचा प्रयत्न पेडणे सेवा ट्रस्टकडून करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.