गोवा खबर

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी जवानांना दिल्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. सीआरपीएफ ने आपले अतुल्य शौर्य आणि कर्तव्याप्रती अद्वितीय निष्ठा दाखवून आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 

भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे संरक्षण करण्यासह, अत्यंत आव्हानात्मक स्थितीत नागरिकांची सेवा करण्यापर्यंत, प्रत्येक वेळी सीआरपीएफ च्या जवानांनी देश प्रथम या तत्वाने काम केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. नक्षलवादाचा समूळ  नायनाट करण्याच्या लढाईतले त्यांचे योगदान अधोरेखित करत, त्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात शांतता आणि समृद्धी येण्यात त्यांनी मदत केल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

Trending

Exit mobile version