गोवा खबर

सम्राट काव्यमहोत्सव 2026 मध्ये किशोर शहा आणि कवी दत्ताप्रसाद जोग यांचा विशेष सत्कार

Published

on

Spread the love

गोवा खबर : नुकत्याच संपन्न झालेल्या सम्राट काव्यमहोत्सव 2026 मध्ये शिक्षण, साहित्य आणि प्रेरणादायी कार्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जी.डी.पी. फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त किशोर शहा आणि जागतिक विक्रमवीर कवी दत्ताप्रसाद जोग यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


शिक्षण क्षेत्रात तसेच प्रेरणादायी प्रशिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत किशोर शहा यांना सन्मानित करण्यात आले. विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.

याच कार्यक्रमात कवी दत्ताप्रसाद जोग यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. सलग 24 तास अखंड काव्यवाचनाचा जागतिक विक्रम प्रस्थापित करून साहित्य क्षेत्रात नवा इतिहास घडविल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक केले.

हा सत्कार प्रसिद्ध चित्रपट आणि वेब सिरीज लेखक, कवी व गीतकार अरविंद जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी सम्राट काव्यमहोत्सव 2026 चे अध्यक्ष दीपक नार्वेकरइन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परबSCI स्टेट I चे अध्यक्ष शशिकांत पुनाजी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, कवी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सम्राट काव्यमहोत्सवाच्या माध्यमातून साहित्य, संस्कृती आणि प्रेरणादायी कार्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. यंदाच्या महोत्सवात गोव्यासह विविध राज्यांतील कवी, लेखक आणि कलाकारांनी सहभाग नोंदवत आपल्या साहित्यकृती सादर केल्या. विविध काव्यवाचन सत्रे, साहित्यिक चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Trending

Exit mobile version