गोवा खबर

अजय शर्मा, वर्षा शर्मा, टिकम सिंग यांची बदली; गौरव सिकारवार, श्वेता सिंह चौहान गोव्यात

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्मू (AGMUT) कॅडरमधील संवर्गातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत. या आदेशानुसार गोवा पोलीस दलातील चार वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यांच्या जागी दोन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गोवा पोलीस दलातील महानिरीक्षक (IGP) पदावरील अजय कृष्ण शर्मा आणि उपमहानिरीक्षक (DIG) वर्षा शर्मा यांची दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. तसेच अधीक्षक टिकम सिंग वर्मा व अर्शी आदिल यांची जम्मू-काश्मीर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. हे बदलीचे आदेश तातडीने लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीर येथून पोलीस अधीक्षक गौरव सिकारवार यांची गोव्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दिल्लीहून पोलीस अधीक्षक श्वेता सिंह चौहान यांचीही गोव्यात बदली करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या बदल्यांमुळे गोवा पोलीस दलाच्या वरिष्ठ पातळीवरील प्रशासकीय रचनेत मोठा फेरबदल होणार आहे.

Trending

Exit mobile version