गोवा खबर : गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी माजी गोवा प्रदेश काँग्रेस समिती (GPCC) अध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी मतभेद असल्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे.
माध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, अमित पाटकर काँग्रेससोबतच आहेत आणि ते कधीही भेटण्यासाठी आले तरी त्यांचे स्वागतच आहे. त्यांच्या आणि पाटकर यांच्या दरम्यान कोणताही संघर्ष किंवा वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमित पाटकर यांच्या भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, “अमित पाटकर हे आमचे नेते आहेत.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, पक्षात कोणतीही फूट नसल्याचा संदेश त्यांनी दिला.