गोवा खबर

गोव्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट; मुसळधार पावसासह ताशी ५०-६० किमी वेगाने वाऱ्याचा इशारा

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतीय हवामान विभागाने (IMD) गोव्यासाठी ७ ते १० जुलै या कालावधीत यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

७ जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसासह ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर ८ जुलै रोजी काही ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

९ आणि १० जुलै रोजी राज्यातील काही विलग ठिकाणी मुसळधार पाऊस आणि ४० ते ५० किमी प्रतितास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ११ ते १३ जुलै या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून, यलो अलर्ट मागे घेण्यात येणार असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजातून स्पष्ट झाले आहे.

Trending

Exit mobile version