गोवा खबर : सत्तरी येथे युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया, गोवा राज्य शाखेतर्फे आयोजित ‘गोवा मान्सून ट्रेकिंग अभियान २०२६’ चा उत्साहात प्रारंभ झाला.
आमदार दिव्या राणे यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून याचे उद्घाटन केले. हे अभियान १० ऑगस्टपर्यंत चालणार असून देशभरातील युवक-युवती यात सहभागी होणार आहेत. पर्यावरण जनजागृती, साहसी पर्यटन आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.