गोवा खबर

काँग्रेसमधील अंतर्गत कलह तीव्र; ‘गोवा काँग्रेस पार्टी’च्या नोंदणीची प्रक्रिया, आज के. सी. वेणुगोपाल गोवा दौऱ्यावर

Published

on

Spread the love



गोवा खबर : गोवा काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होत असल्याचे चित्र समोर आले आहे. काँग्रेसमधील काही नाराज नेत्यांनी ‘गोवा काँग्रेस पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पक्षातील वाढत्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे आज गोवा दौऱ्यावर येणार असून, पक्षातील अंतर्गत संकटावर चर्चा करून परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

गोवा काँग्रेसमधील घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, वेणुगोपाल यांच्या दौऱ्यानंतर पक्षाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Trending

Exit mobile version