गोवा खबर

सांगे मतदारसंघाला एसटी आरक्षण मिळाल्यास भाजप उमेदवारासाठी मुख्य प्रचारक म्हणून काम करणार : फळदेसाई

Published

on

Spread the love

गोवा खबर : मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगे विधानसभा मतदारसंघाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षण मिळाल्यास, त्या मतदारसंघातील भाजप उमेदवारासाठी मुख्य प्रचारक म्हणून काम करण्यास आपण तयार असल्याचे सांगितले.

सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, सांगे मतदारसंघाला एसटी आरक्षण लागू झाल्यास पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या विजयासाठी आपण मुख्य प्रचारकाची भूमिका पार पाडू. पक्षाच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देत भाजपच्या विजयासाठी आपण पूर्ण ताकदीने काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Trending

Exit mobile version