गोवा खबर

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रस्तावित IIT प्रकल्पाला विरोधाचे कारण नाही; ग्रामस्थांची समजूत काढू : ढवळीकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय (GEC), फर्मागुडी येथे प्रस्तावित IIT प्रकल्प सरकारी जमिनीवर उभारण्यात येणार असून, या प्रकल्पाबाबत कोणतीही अडचण नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

ढवळीकर म्हणाले की, या प्रकल्पाला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असला तरी त्यांची समजूत काढण्यात येईल आणि त्यांना प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धार्मिक विषयावर बोलताना सुदिन ढवळीकर म्हणाले की, “मला देवाबद्दल कोणी शिकवण्याची गरज नाही. मी नेहमीच माझ्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन केले आहे आणि पुढेही करत राहीन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात प्रस्तावित IIT प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ढवळीकर यांनी ही भूमिका मांडली.

Trending

Exit mobile version