गोवा खबर

विजया मेहता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजया मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  विजया मेहता या आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्या होत्या तसेच त्यांच्या सर्जनशीलता आणि कलात्मक उत्कृष्टतेबद्दल असलेल्या निष्ठेसाठी ओळखल्या जात होत्या, असे  मोदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांमधील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यप्रेमींना प्रेरणा मिळाली.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले, विजया मेहता यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सदैव स्मरणात राहतील.

त्या आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्या होत्या तसेच सर्जनशीलतेसाठी आणि कलात्मक उत्कृष्टतेप्रती असलेल्या निष्ठेसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांमधील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यप्रेमींना प्रेरणा मिळाली.

Trending

Exit mobile version