गोवा खबर

गुजच्या नव्या कार्यकारी समितीची निवड

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोवा पत्रकार संघटनेच्या (गुज) कार्यकारी समितीची २०२६ ते २०२८ या कार्यकाळासाठी निवडणूक पार पडली असून यामध्ये १० सदस्यांची मुख्य निवड करण्यात आली आहे. पणजी येथील संघटनेच्या कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण २१९ पात्र मतदारांपैकी १५१ मतदारांनी आपला हक्क बजावला.

या निवडणुकीत मतदारांनी १० सदस्यांची कार्यकारी समितीवर निवड केली आहे. यामध्ये किशोर केशव नाईक गावकर, सगुण गावडे, गौरी मळकर्णेकर, संदीप देसाई, वासुदेव पागी, उपेंद्र नाईक, विल्यम पॅट्रिक रॉड्रिग्ज, ॲशली डो रोझारियो, समीर अशोक नाईक आणि अजय लाड यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सदस्यांकडे आता आगामी दोन वर्षांसाठी संघटनेची धुरा असणार आहे.

स्वप्नील तारी, नारायण पिसुर्लेकर, क्रांतीराज सम्राट, रॉ डायस, अनिल सनदी आणि संदीप व्ही हे उमेदवारही रिंगणात होते. राजतिलक नाईक यांची अध्यक्ष म्हणून आधीच बिनविरोध निवड झालेली आहे.

निवडणूक अधिकारी जमालुद्दीन शेख यांनी निवडणूक प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि संघटितपणे पार पाडली. प्रमोद ठाकूर, ओंकार फळारी आणि डायना फर्नांडिस यांंनी निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य केले.

Trending

Exit mobile version