गोवा खबर

गोव्यात पुढील सात दिवस ‘यलो अलर्ट’; २९ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Published

on

Spread the love

गोवा खबर: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आल्तिनो, पणजी येथील हवामान केंद्राने गोव्यासाठी २७ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीसाठी सुधारित हवामान अंदाज आणि पूर्वसूचना जारी केली आहे. उत्तर व दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ ते २९ जून दरम्यान राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच ३० जून ते ३ जुलै या कालावधीत काही भागांत मुसळधार पावसासह ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टी भाग, सखल भाग तसेच डोंगराळ परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या जिल्हानिहाय पर्जन्यमान अंदाजानुसार, २७ जून ते ३ जुलै या संपूर्ण कालावधीत उत्तर व दक्षिण गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची (७६ ते १०० टक्के ठिकाणी) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Trending

Exit mobile version