गोवा खबर: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) गोवा केंद्राने २५ जून ते १ जुलै २०२६ या कालावधीसाठी प्रसिद्ध केलेल्या अद्ययावत हवामान अंदाजानुसार, गोव्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २५ ते २७ जून दरम्यान उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच २८ जून ते १ जुलै या कालावधीत राज्यातील काही भागांत मुसळधार पावसासह ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार, २५ जून ते १ जुलै या संपूर्ण कालावधीत गोव्यात बहुतांश भागांत पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.