गोवा खबर

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून चार अत्याधुनिक रुग्णवाहिका दाखल

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आरोग्य खात्याने चार अत्याधुनिक रुग्णवाहिका आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल हिरवा झेंडा दाखवून या रुग्णवाहिका सेवेत रुजू केल्या. या प्रसंगी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेल्या रुग्णवाहिकांवर सरकारने १.४३ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. महामार्गावरील अपघातानंतर पहिल्या काही मिनिटांचे (गोल्डन अवर) महत्त्व लक्षात घेऊन जखमींना त्वरित उपचार मिळवून देणे आणि त्यांचे प्राण वाचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Trending

Exit mobile version