गोवा खबर

कदंब महामंडळात कंत्राटी पद्धतीने थेट ३०० पदांची भरती; खासगी बसमालक प्रलंबित मागण्यांबाबत आक्रमक

Published

on

Spread the love

गोवा खबर : कदंब परिवहन महामंडळ लिमिटेडने कंत्राटी पद्धतीवर एकूण ३०० जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये २०० वाहक (कंडक्टर) आणि १०० जड वाहन चालकांचा (हेव्ही व्हेईकल ड्रायव्हर) समावेश आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २२ हजार रुपये एकूण वेतन दिले जाईल. यासाठी २५ आणि २६ जून रोजी पर्वरी येथील महामंडळाच्या सेंट्रल वर्कशॉपमध्ये थेट मुलाखती (वॉक-इन इंटरव्यू) आयोजित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांकडे आवश्यक वैध परवाने असणे गरजेचे आहे.

दुसरीकडे, प्रलंबित मागण्यांवर कोणताही निर्णय न झाल्याने खासगी बस चालक संघटना आक्रमक झाली आहे. येत्या २६ जूनपर्यंत मागण्यांवर तोडगा न निघाल्यास २९ जून रोजी परिवहन खात्याच्या पर्वरी येथील मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे सरचिटणीस सुदिप ताम्हणकर यांनी दिला आहे.

Trending

Exit mobile version