गोवा खबर

काम न करणाऱ्यांनी आता पदे सोडावीत: दामू नाईक यांचा इशारा, मिशन २०२७ साठी भाजपचे ‘लक्ष्य ३०’

Published

on

Spread the love

गोवा खबर : पणजी येथे आयोजित भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काम न करता केवळ पदे घेऊन बसलेल्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.

आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ४० पैकी ३० जागा जिंकण्याचे ‘मिशन ३०’ पक्षाने निश्चित केले असून बूथ पातळीपासून संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्र्यांसह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधकांकडून सोशल मीडियावर निर्माण केल्या जाणाऱ्या ‘अँटी-इन्कम्बन्सी’च्या वातावरणावर टीका करत, प्रत्यक्षात विकासकामांवर जनतेचा विश्वास कायम असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे वाढवून विकासकामांची प्रभावी मांडणी करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

Trending

Exit mobile version