गोवा खबर : गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्स (GUJ) च्या 2026–2028 या कार्यकाळासाठी राजतिलक नाईक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांच्या दहा पदांसाठी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, या पदांसाठी एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत.
कार्यकारिणी सदस्य पदांसाठी मतदान 27 जून रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान (AGM) पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 अशी असून ते GUJ कार्यालयात होईल.
निवडणूक प्रक्रियेनंतर नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असून, पत्रकार संघटनेच्या आगामी दोन वर्षांच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.