गोवा खबर

ईडीसीची घोडदौड : उत्पन्न ९४ कोटी, नफा ६४ कोटी!

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याच्या औद्योगिक, उद्योजकीय आणि एमएसएमई क्षेत्राला आर्थिक बळ देणाऱ्या ‘ईडीसी’ (EDC) महामंडळाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महामंडळाच्या ४०८ व्या संचालक मंडळ बैठकीत वार्षिक लेख्यांना मंजुरी देण्यात आली. या आर्थिक वर्षात संस्थेने ९४ कोटींचे उत्पन्न आणि ६४ कोटींचा करपूर्व नफा मिळवला आहे.

विशेष म्हणजे, महामंडळाचे बुडीत कर्ज (NPA) प्रमाण केवळ ०.३० टक्क्यांवर आले असून ही संस्था आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम बनली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी महामंडळाच्या शिस्तीचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक करत, ‘स्वयंपूर्ण गोवा’ आणि ‘विकसित गोवा’ संकल्पना पूर्ण करण्यासाठी ईडीसीचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

Trending

Exit mobile version