गोवा खबर

‘अनावश्यक सरकारी बांधकामे तात्काळ थांबवा’

Published

on

Spread the love

गोवा खबर : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस लांबला असून संभाव्य जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारकडे जिल्हा पातळीवर पाण्याचा आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे.

संभाव्य पाणी संकटावर सरकारची प्रतिक्रिया केवळ लोकांना गाड्या धुवू नका किंवा बागांना पाणी घालू नका, असे सांगण्यापुरती मर्यादित असू शकत नाही, असे ते म्हणाले. मोठ्या शासकीय बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर होतो. त्यामुळे जर राज्य सरकारला पाणीटंचाईबाबत खरोखरच काळजी असेल, तर सरकारने स्वतःचे उदाहरण घालून देत राज्यातील सर्व अनावश्यक बांधकाम प्रकल्प परिस्थिती सुधारेपर्यंत तात्पुरते थांबवावेत, असा इशारा आलेमाव यांनी दिला आहे.

Trending

Exit mobile version