गोवा खबर

१ जुलैपासून एआय कॅमेऱ्यांतून मिळणार थेट ‘ई-चलन’

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी १ जुलैपासून ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS) अंतर्गत एआय (AI) कॅमेऱ्यांद्वारे थेट ई-चलन जारी केले जाणार आहे.

मेरशी, वेर्णा, मडगाव, नुवे, वास्को, कलंगूट, आणि म्हापसा यांसारख्या राज्यातील २६ प्रमुख आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये हे आधुनिक कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार मोबाईलवर बोलत गाडी चालवणे किंवा ओव्हरस्पीडिंग केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी १,००० रुपये आणि दुसऱ्यांदा तोच गुन्हा केल्यास १०,००० रुपये दंड होईल. हेल्मेट किंवा सीटबेल्ट न वापरल्यास १,००0 रुपये तर रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाच्या वाहनाला मार्ग न दिल्यास थेट १०,००० रुपयांच्या मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

Trending

Exit mobile version