गोवा खबर

माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना मी माफ केले : ढवळीकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : बहुचर्चित ‘नोकरी-कांड’ आणि पूजा नाईक प्रकरणात आपल्यावर खोटे आरोप करणाऱ्यांपैकी एका मुख्य व्यक्तीने स्वतः भेट घेऊन आपली चूक मान्य केली व माफी मागितली, असा खुलासा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे.

गोमंतकीय संस्कृतीला जागत आपण त्या व्यक्तीला माफ केले असले, तरी या प्रकरणामागील खरा मुख्य सूत्रधार कोण आहे हे लवकरच जनतेसमोर येईल, असा दावा त्यांनी केला.

याच दरम्यान आमवादी पक्षाने त्यांच्या घराबाहेर काढलेल्या मोर्चाचा समाचार घेताना, गोव्यात ‘आप’ची स्थिती ‘आरजी’ पक्षासारखीच होईल अशी घणाघाती टीका ढवळीकर यांनी केली. तसेच भाजप-मगोप युती भक्कम असून पुन्हा एकदा हेच युती सरकार गोव्यात अधिकारावर येईल, असा ठाम विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Trending

Exit mobile version