गोवा खबर

मेगा प्रकल्पाविरोधात आझाद मैदानावर आंदोलन

Published

on

Spread the love

प्रस्तावित मेगा हाऊसिंग प्रकल्पाविरोधात कारापूर-सर्वण ग्रामस्थ आक्रमक; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

गोवा खबर : कारापूर-सर्वण येथील प्रस्तावित मेगा हाऊसिंग प्रकल्पाविरोधात गेल्या ७५ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी गुरुवारी राजधानी पणजीतील आझाद मैदान परिसरात निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांनी आझाद मैदानावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला असता, परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेकांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडून सरकारविरोधात आणि प्रकल्प रद्द करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर, रामा काणकोणकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना जुने गोवा पोलीस स्थानकात आणण्यात आले. या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार वीरेश बोरकर, अमित पाटकर आणि ‘आप’चे समन्वयक वाल्मिकी नाईक आदी प्रमुख नेते उपस्थित होते. आंदोलकांनी हा संपूर्ण प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

Trending

Exit mobile version