गोवा खबर

गोवा राज्य सहकारी संघाच्या नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन; भाजपकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन

Published

on

Spread the love

गोवा खबर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि माजी राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर यांनी गोवा राज्य सहकारी संघ, पणजी यांच्या नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अभिनंदन करून संघाच्या प्रगतीसाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

पीपल्स हायस्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (Salary Earners Constituency) चे अध्यक्ष संजय मांद्रेकर यांची गोवा राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी, तर आदर्श व्हीकेएसएस सोसायटी, शिरोडा (Primary Agricultural Co-operative Society) चे अध्यक्ष नारायण कामत यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर उपस्थित होते. तसेच गोवा राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळातील दीपक गावंस, फ्रान्सिस्को फिलीप मस्कारेन्हास, विजयकांत गावंकर, दामोदर नाईक, दिलीप बोरकर, संदेश मांद्रेकर, संकेत मुळे , गोविंद नाईक आणि माशाल अडपईकर हेही उपस्थित होते.

या प्रसंगी सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आणि गोवा राज्य सहकारी संघाच्या विविध उपक्रमांना पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली.

Trending

Exit mobile version