गोवा खबर : गोव्यातील अनुसूचित जमातीला (एसटी) विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील १५ दिवसांत केंद्राची अंतिम भूमिका स्पष्ट करणार आहेत. गोव्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नुकतीच दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. या आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली असून आता केवळ केंद्र सरकारची अंतिम अधिसूचना येणे बाकी आहे. यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काही मतदारसंघ एसटी समाजासाठी राखीव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.