गोवा खबर : गोव्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आणि पोलीस अधीक्षक एडविन कुलासो यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर २००८ मध्ये पोर्तुगीज नागरिकत्व आणि जन्मदाखल्याशी संबंधित एक गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणात मुख्य सचिवांकडून आलेल्या फाईलची दखल घेत गृहखात्याने त्यांच्या निलंबनाची अंमलबजावणी केली आहे. सुरुवातीला ही फाईल बंद करण्यात आली होती, मात्र तक्रारदाराने हायकोर्टात धाव घेतल्यानंतर याचा तपास पुन्हा सुरू झाला. चौकशीत कुलासो यांनी पोर्तुगालमध्ये जन्म आणि विवाहाची नोंदणी केल्याचे समोर आले असून, दुहेरी नागरिकत्वाला परवानगी नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.