गोवा खबर

शिवसेनेचे संपर्क नेते गजानन कीर्तीकर आजपासून गोव्यात

Published

on

Spread the love

गोवा खबर : शिवसेनेचे राज्य संपर्क नेते तथा माजी खासदार गजानन कीर्तीकर हे आज दि. १६ ते १९ जून या कालावधीत चार दिवसीय गोवा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते विविध राजकीय बैठका, पत्रकार परिषद आणि पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

या दौऱ्यात कीर्तीकर राज्याच्या विविध भागांतील शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक आढावा घेणार आहेत. १७ जून रोजी सकाळी ११ वाजता पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात पत्रकार परिषदेत ते राज्यातील पक्षाची आगामी भूमिका स्पष्ट करणार आहेत. १८ जून रोजी गोवा क्रांतीदिनानिमित्त कीर्तीकर पणजीतील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करणार आहेत. १९ रोजी शिवसेना स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात ते अध्यक्षस्थान भूषवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Trending

Exit mobile version