गोवा खबर

संकेतस्थळ पूर्ववत करून ‘जीटीडीसी’चा करार रद्द करा

Published

on

Spread the love

गोवा खबर : दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनने गोवा पर्यटन विकास महामंडळासोबत (जीटीडीसी) करण्यात आलेल्या कराराविरोधात पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित करार रद्द करण्याची तसेच असोसिएशनचे संकेतस्थळ तातडीने पूर्ववत करण्याची मागणी फोंडा येथील पत्रकार परिषदेत केली आहे.

या पत्रकार परिषदेला असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश वेळीप, नंदेश नाईक देसाई, सतीश सातपालकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दूधसागर परिसरातील पर्यटन व्यवसाय हा हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत असल्याने या व्यवसाया संदर्भात कोणताही निर्णय घेताना स्थानिक व्यवसायिकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

नीलेश वेळीप यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत दूधसागर पर्यटन हंगाम पुन्हा सुरू होणार असून हा व्यवसाय सुरळीतपणे सुरू व्हावा यासाठी दूधसागर आजोबा देवस्थानात साकडे घालण्यात आले आहे. विद्यमान करारामुळे स्थानिकांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करत हा करार रद्द करून पूर्वीची व्यवस्था पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाकडे या मागण्या करण्यात येत असून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदनही सादर करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा पंचायत निवडणुकांनंतर या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. असोसिएशन सातत्याने मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून मान्सूनपूर्वी दोन्ही मागण्यांवर निर्णय होईल अशी त्यांना अपेक्षा आहे.

Trending

Exit mobile version