गोवा खबर

वाढीव वीज बिल तीन हप्त्यांमध्ये भरा : ढवळीकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : ज्या ग्राहकांचे वीज बिल वाढले आहे, त्यांना तीन हप्त्यांमध्ये वीज बिल भरण्याची सुविधा दिली जाईल, असे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. हणजूण, शिवोली, हणजूण येथील नागरिकांनी विद्युत भवनामध्ये केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली.

मंत्री ढवळीकर यांनी आरोप केला की, वाढीव वीज बिलप्रश्नी काहीजण वीज खात्यात जाऊन राजकीय आंदोलन करत असून निवडणुका जवळ आल्याने याचा फायदा घेत आहेत. राज्यात आतापर्यंत एक लाख स्मार्ट मीटर बसविले असून ही योजना केंद्र सरकारची आहे. काही लोक याला विरोध करत असले तरी त्यांनी अगोदर माहिती घ्यावी आणि यात काही चुका असतील तर त्या सुधारण्यास सरकार तयार आहे. आगामी २०२७ च्या निवडणुकीत भाजप-मगोप युती कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Trending

Exit mobile version