गोवा खबर

फिलीपिन्समध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, अनेक इमारती कोसळल्या

Published

on

Spread the love

गोवा खबर : फिलीपिन्सच्या मिंदानाओ प्रदेशात 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भूकंपानंतर फिलीपिन्स आणि इंडोनेशियातील अनेक किनारी भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले असून काही इमारती कोसळल्याची माहिती समोर आली आहे. एका शाळेची इमारत कोसळतानाचे दृश्यही समोर आले असून स्थानिक प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे.

अमेरिकन आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन संस्थांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला देण्यात आला असून समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

भूकंपानंतर त्सुनामीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून संभाव्य जीवित आणि वित्तहानीचा आढावा घेतला जात आहे. फिलीपिन्स आणि इंडोनेशियातील संबंधित यंत्रणा सतर्क मोडवर असून नागरिकांना अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version