गोवा खबर

म्हजे घर योजनेअंतर्गत रवींद्र भवन, मडगाव येथे ४ जून २०२६ रोजी महाशिबिर

Published

on

Spread the love




गोवा खबर:दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हा प्रशासनाने ४ जून २०२६ रोजी रवींद्र भवन, मडगाव येथे अर्जांवर जलदगतीने कार्यवाही करण्यासाठी आणि योजनेअंतर्गत अर्जदारांना साहाय्य पुरविण्यासाठी, म्हजे घर योजनेअंतर्गत मेगा शिबिर आयोजित केले आहे. म्हजे घर योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेल्या सर्व अर्जदारांनी त्यांनी या शिबिरात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. अर्जदारांना आवश्यक दाखल्यासह शिबीराला उपस्थित राहून आपले अर्ज मंजूर करून घ्यावे.

अर्जदारांच्या सोयीसाठी, प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र काउंटर, विभाग उभारण्यात येतील. सासस्टी, फोंडा, मुरगांव, केपे, सांगे, धारबांदोडा आणि काणकोण तालुक्यांचे उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित असतील.
ज्या अर्जदारांची प्रकरणे कागदपत्रे सादर न केल्यामुळे किंवा इतर त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांना आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहण्याची विशेष विनंती आहे. त्यानंतर सकाळी सुमारे ११.३० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पात्र लाभार्थ्यांना 'म्हजे घर योजने'अंतर्गत जारी केलेली प्रमाणपत्रे, सनद, मालकी हक्काची कागदपत्रे आणि इतर आदेश वितरित करतील.  सर्व अर्जदारांना आणि जनतेला विनंती आहे की  त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आपले सहकार्य द्यावे.

Trending

Exit mobile version