गोवा खबर

शैक्षणिक संस्थेजवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Published

on

Spread the love

                                                    

गोवा खबर:गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने शैक्षणिक संस्थेजवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीची आणि दारू विक्री (घाऊक आणि किरकोळ) नियमन कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे.

सिगारेट्स आणि इतर तंबाखू उत्पादन कायदा, २००३ (कोटपा) च्या कलम ६ (ब) खाली, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस सक्त मनाई आहे. शिवाय, बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा, २०१५ च्या कलम ७७ नुसार, कोणत्याही मुलाला तंबाखू किंवा अल्कोहोलसह मादक पदार्थ देणे किंवा देण्यास कारणीभूत ठरणे हा एक शिक्षापात्र गुन्हा आहे. वरील कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने सर्व शैक्षणिक संस्थाना परिपत्रक जारी करून शैक्षणिक संस्थाना आपल्या संस्थेच्या बाहेर १०० मीटर परिसरात पदार्थांच्या विक्रीस मनाई आहे” असे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संस्था प्रमुखांनी तंबाखूची किंवा दारूची विक्री यांसारख्या कोणत्याही उल्लंघनाची माहिती पोलीस ठाण्याला आणि संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी.

Trending

Exit mobile version