गोवा खबर

पर्यावरण मंत्री यादव यांच्याशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

या भेटीदरम्यान गोव्यातील शाश्वत विकास (Sustainable Development) आणि हरित विकास (Green Growth) यासंदर्भातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्याच्या पर्यावरणीय समतोलासोबत विकासाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि भविष्यातील संधींबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला.

गोव्यात पर्यावरणपूरक विकासाला चालना देत राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून पुढील पावले उचलण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

Trending

Exit mobile version