गोवा खबर

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक देसाई निवृत्त; प्रभुदेसाई यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी

Published

on

Spread the love

गोवा खबर : दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक (SP) संतोष देसाई हे सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर रेल्वे पोलीस अधीक्षक (SP Railways) शेखर प्रभुदेसाई यांच्याकडे दक्षिण गोवा जिल्हा तसेच कुषावती पोलीस जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

पुढील आदेश मिळेपर्यंत शेखर प्रभुदेसाई हे दोन्ही जिल्ह्यांचा कारभार सांभाळणार आहेत. राज्य सरकारकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले असून, नव्या नियुक्तीपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था कायम राहणार आहे.

संतोष देसाई यांनी आपल्या सेवाकाळात दक्षिण गोवा जिल्ह्यात विविध कायदा व सुव्यवस्था विषयक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांच्या निवृत्तीनंतर शेखर प्रभुदेसाई यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याने पोलीस प्रशासनाच्या कामकाजात सातत्य राहणार आहे.

Trending

Exit mobile version