गोवा खबर

गोव्याच्या भविष्यासाठीचा लढा सुरूच राहणार : अमित पाटकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याची ओळख, संस्कृती आणि जनतेचे हक्क जपण्यासाठी गेल्या चार वर्षांत आपण एकत्रितपणे संघर्ष केल्याचे मत गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले आहे. पद किंवा अधिकारापेक्षा गोवा आणि गोमंतकीयांसाठी सातत्याने काम करण्याची जिद्द अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमित पाटकर यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात, गेल्या चार वर्षांत राज्यातील विविध गावांमध्ये जाऊन जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्यात आला, विविध मोहिमा राबविण्यात आल्या आणि गोव्याच्या हितासाठी लढा देण्यात आल्याचे नमूद केले आहे. या सर्व प्रयत्नांमागे गोव्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे एकच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्याप्रती आपली बांधिलकी कायम असून राज्याच्या भविष्यासाठीचा प्रवास आणि संघर्ष यापुढेही सुरू राहणार असल्याचे अमित पाटकर यांनी स्पष्ट केले. गोव्याच्या जनतेसाठी आणि राज्याच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार कायम असल्याचेही त्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केले.

Trending

Exit mobile version