गोवा खबर

मगोप नेते ढवळीकर यांचा फोंडातून लढण्याचा निर्णय चतुर्थीनंतरच

Published

on

Spread the love

गोवा खबर : आगामी विधानसभा निवडणूक फोंडा मतदारसंघातून लढवायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय आपण गणेश चतुर्थीनंतरच घेणार असल्याचे मगोपचे ज्येष्ठ नेते आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

काही समर्थकांनी त्यांना फोंड्यातून लढण्याचा सल्ला दिला असला, तरी सध्या भाजप-मगोपची युती असल्याने मित्रपक्षाशी चर्चा करूनच पुढील पाऊल उचलले जाईल. मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. तसेच, त्यांचे पुत्र मिथिल ढवळीकर निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, मिथिल सध्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय असला तरी निवडणूक लढवण्याचा निर्णय हा त्याचा वैयक्तिक असेल.

Trending

Exit mobile version