गोवा खबर

कोट्यवधी रुपये देण्यापेक्षा राज्य सरकारने रो-रो फेरी बोट खरेदी करावी

Published

on

Spread the love

गोवा खबर : चोडण ते रायबंदर जलमार्गावर धावणाऱ्या रो-रो फेरी बोटी खाजगी कंपनीकडून भाड्याने घेण्याऐवजी सरकारने त्या स्वतःच्या मालकीच्या खरेदी कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी नदी परिवहन खात्याकडे केली आहे.

ताम्हणकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जुलै २०२५ ते मार्च २०२६ या काळात सरकारला फेरी सेवांमधून केवळ ४४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर खाजगी कंपनीला तब्बल ७.७६ कोटी रुपये भाडे देण्यात आले. या व्यवहामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, या बोटींमधून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी सरकारने स्वतःच्या मालकीची फेरी सेवा सुरू करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Trending

Exit mobile version